Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – चारित्र्याच्या संशयावरून होणार्‍या छळाला कंटाळून 59 वर्षाच्या महिलेची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुला मुलींची लग्न झाले, तरी पती चारित्र्याचा संशय घेऊन करत असलेल्या छळाला कंटाळून एका ५९ वर्षाच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

अनिता हिवराळे (वय ५९, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

 

याबाबत त्यांच्या मुलीने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७५७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नागनाथ हिरा हिवराळे Nagnath Hira Hiwarale (वय ६५, रा. गोंधळेनगर, हडपसर – Hadapsar Crime News) याच्याविरुद्ध गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. ही घटना १७ मे रोजी सकाळी घडली होती.

याबात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अनिता हिवराळे या एका दुकानात काम करत होत्या. तर, त्यांचा पती नागनाथ हा मोलमजुरी करतो. त्यांच्या मुलीचा विवाह झाला आहे. नागनाथ हा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन सातत्याने मारहाण (Beating) करीत असे. शारीरीक व मानसिक छळ करीत होता. या छळाला कंटाळून अनिता यांनी १७ मे रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आईचा अंत्यविधी केल्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करुन त्यांच्या मुलीने तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Hadapsar Police Station – 59-year-old woman commits suicide
due to harassment due to suspicion of character

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा