Maharashtra Politics News | ‘मविआत राष्ट्रवादीच मोठा भाऊ’, अजित पवारांच्या विधानावर काँग्रेसचा पलटवार; म्हणाले- ‘कोणी गर्व करावा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागत होती. मात्र आता आपण काँग्रेसपेक्षा (Congress) मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या 44 आणि आपल्या 54 जागा आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे 56 आमदार होते. हे गणित आहे, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले होते. (Maharashtra Politics News) अजित पवारांच्या विधानावरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अंतर्गत वाद होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पलटवार केला आहे.

अजित पवार यांच्या विधानावर माध्यमांशी बोलताना (Maharashtra Politics News) नाना पटोले म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आमची परंपरा आहे. कोणी गर्व करावा हा त्यांचा अधिकार आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी मोघम प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) निशाणा साधताना नाना पटोले म्हणाले, या बजेटमध्ये हजारो कोटी रुपये फक्त प्रसिद्धी आणि जाहिरातींसाठी दिले होते. हे सरकार रडत्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा आपले हसरे चेहरे लावून योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडून लोकांच्या जखमेवर मीठ टाकण्याचं काम करत आहे. सरकार दारी काय कुठेच राहणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

डीएनए टेस्ट करावी लागेल

अजित पवार यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत
(MP Sanjay Raut) यांनी देखील पलटवार केला आहे. ते म्हणाले, सगळ्यांची डीएनए टेस्ट (DNA Test) करु आम्ही एकदा.
हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ,
मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजप युतीमध्ये (Shiv Sena-BJP Alliance) देखील होता.
तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. मविआत असे मतभेद नाहीत.
अजित दादा काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? याही पेक्षा प्रत्येक जण आपआपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | nationalist is the big brother in mahavikas aghadi nana patoles counter attack on ajit pawars statement said one should be proud

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा