Maharashtra Politics News | ‘नाहीतर राजकारणातून संन्यास घ्या’, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाचा खोचक सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राजकारणात काहीच नाही मिळालं तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) जातील मेंढ्या चरायला. मला कसलीच चिंता नाही, असे विधान भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिल्लीत रासपच्या कार्यक्रमात केले होते. या विधानावरुन (Maharashtra Politics News) पुन्हा एकदा त्या नराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे (Thackeray group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी राजकारणातून संन्यास (Retirement) घेण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.

 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

दिल्लीत झालेल्या रासपच्या (Rashtriya Samaj Party) कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला लोक म्हणतात पक्ष माझा. पण मी भाजपची आहे. पण पक्ष माझा नाहीये. भाजप पक्ष खूप मोठा आहे. याशिवाय, आम्हाला काहीच नाही मिळालं तर मी जाऊन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला. तसेच रासप माझ्या भावाचा पक्ष आहे. वडिलांशी भांडण झालं तर मी भावाच्या घरी जाईन, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. (Maharashtra Politics News)

 

राजकारणातून संन्यास घ्या

पंकजा मुंडे यांच्या विधानावरुन संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, आम्हाला मुंडे परिवाराविषयी कायम आस्था आणि प्रेम राहील ती गोपीनाथ मुंडेंमुळे (Gopinath Munde). ते असते तर शिवसेना-भाजप युतीला (Shiv Sena-BJP Alliance) वेगळी दिशा मिळाली असती. आजचं चित्र दिसलं नसतं. पण गोपीनाथ मुंडे नसल्यामुळे त्यांच्या परिवाराची राजकारणात वाताहात केली जात आहे. अशा परिस्थितीत परिवाराच्या प्रमुख लोकांनी हिंमतीनं, साहसानं निर्णय घेण्याची गरज असते. परिणाम काय होतील, याची पर्वा न करता निर्णय घ्यायचे असतात. तरच तुम्ही राजकारणात टिकून राहू शकता. नाहीतर तुम्ही राजकारणातून संन्यास घ्यायला हवा. आमच्यावर अन्याय होतोय, अशा रडण्याला कुणीही विचारत नाही, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.

 

मुंडे परिवारासोबत आस्था कायम

संजय राऊत पुढे म्हणाले, पंकजा मुंडे यांचा गेल्या निवडणुकीत पराभव का व कसा झाला? हे सांगण्याची आता गरज नाही.
भाजप परिवारातच आता मुंडे परिवाराविरोधात राजकारण सुरु आहे. काहीही असले
तरी आमची मुंडे परिवारासोबत आस्था कायम राहील, असेही राऊत यांनी सांगितले.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | sanjay raut on pankaja munde statement about bjp party Thackeray group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा