Maharashtra Politics News | महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार? भाजपचा महाविकास आघाडीला टोला

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | विरोधकांनी एकीची कितीही मूठ बांधली तरी त्यांना यश येणार नाही. एकवटलेले विरोधक घराणेशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दिल्ली काय सांभाळणार, असा टोला भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना लगावला. (Maharashtra Politics News) ते माध्यमांशी बोलत होते.

 

ADV

बावनकुळे पुढे म्हणाले, पैशापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा मिळवणाऱ्या विरोधकांची पुढची पिढी धोक्यात आली आहे. म्हणून त्यांना वाटतं की आम्ही आज एकत्र आलो नाही, तर आमचे सर्वकाही उद्धवस्त होईल. आम्ही केलेले काळे धंदे हे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पुढच्या पिढ्यांची चिंता करण्याकरिता एकत्र आले आहेत. अशा बोलघेवड्या लोकांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. आता महाराष्ट्राची जनता त्यांना साथ देणार नाही, असे बावनकुळे म्हणाले. (Maharashtra Politics News)

 

विरोधकांनी कितीही वज्रमूठ बांधली तरीही मोदी जगातले सर्वोत्कृष्ट नेते म्हणून समोर आले आहेत. 2024 मध्ये एनडीए 400 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल. तेवढी ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात तयार झाली आहे. भारतातील प्रत्येक नागरिक मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये भारत मांडला आहे आणि आता देखील ते अमेरिकेत मांडत आहेत.

राज्यात सत्तेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार (Mumbai Municipal Corruption) केला.
मविआ सरकारच्या काळात कोविड घोटाळ्यासह एवढे काळे धंदे केले आहेत की,
तक्रारीच्या आधारे चौकशी झाली असेल. अशा भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी तक्रार केली असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

 

Web Title : Maharashtra Politics News | they could not be manage maharashtra how will manage delhi chandrasekhar bawankule slams mahavikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा