Maharashtra Politics News | ‘2024 मध्ये सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करायचं, हा अजेंडा ठरला होता’, बावनकुळेंचा मोठा दावा (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपाला एक वर्ष होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (Resignation) दिला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळलं. मविआचे सरकार कोसळल्यानंतर आता भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात अलिखित करार झाला होता, असं बावनकुळे म्हणाले. (Maharashtra Politics News) ते पुण्यात भाजपच्या टिफिन पे चर्चा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

 

बावनकुळ म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या खिशाला पेन नव्हता. अजित पवार (Ajit Pawar) सकाळी सात पासून मंत्रालयात बसत होते. आमचे मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही, असं शिवसेनेचे अनेक आमदार (Shivsena MLA) सांगत होते. 75 टक्के शिवसेनेचे आमदार नाराज आहेत, हे मी सत्तांतराच्याआधी अनेकवेळा सांगत होतो. (Maharashtra Politics News)

 

त्यांच्यात अलिखित करारनामा झाला

उद्धव ठाकरे आदित्यच्या (Aaditya Thackeray) प्रेमात होते आणि त्यांचा अलिखित करारनामा झाला होता. 2019 ते 2024 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि नेत्यांनी मिळून शिवसेना कमी करायची, शिवसेनेचे आमदार कमी करायचे, अशी छुपी युती आणि सहमती उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिली होती. राष्ट्रवादीचे 100 आमदार करायचे आणि आपले आमदार कमी करायचे. 2024 मध्ये सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) मुख्यमंत्री करायचं आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करायचं, हा अजेंडा ठरला होता, असा खळबळजनक दावा बानकुळे यांनी केला आहे.

अन् शिवसेनेचे आमदार बाहेर पडले

शिवसेना आमदारांना कळालं तेव्हा पराभव होऊ नये यासाठी ते बाहेर पडले. आपण निवडून येऊ का नाही? ही भीती शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे असताना होती. या भीतीमुळे हे सत्तापरिवर्तन झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

 

Web Title : Maharashtra Politics News uddhav thackeray and sharad pawar unwritten rule cm for 2024 was fixed says bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा