Maharashtra Rain Update | राज्यात आगामी 5 दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज; मुंबईसह पुण्यात मुसळधार, कोल्हापुरात ‘धो-धो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | जून महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होता. सध्या सर्वत्र पावसाची परिस्थिती (Maharashtra Rain Update) निर्माण झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप दिसून येत आहे. तर मुंबईसह (Mumbai), कोकण (Konkan), ठाणे (Thane), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur) या ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. कोल्हापूरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने पंचगंगा नदीच्या (Panchganga River) पाणी पातळीत वाढ झाली आहे. आगामी पाच दिवस सर्वदूर पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवली आहे.

 

आगामी चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर पाऊस (Maharashtra Rain Update) पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. दरम्य़ान पुण्यातही मागील दोन दिवसांपासून पावसाने रिपरिप सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळं या घाटातील दरड खाली कोसळली आहे.
हा घाट धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.
तसेच, रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे.

कोल्हापूरात धो धो पाऊस –
मागील 48 तासांत पंचगंगेची पाणीपातळी 10 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे पुराचा मोठा धोका आहे.
सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 30 फूट इतकी झाली असून या नदीवरील 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे.

 

Web Title :- Maharashtra Rain Update | maharashtra mumbai pune rain updates 6 july 2022 heavy rains in mumbai and konkan warning citizens

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

 

Former Mumbai CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी ‘कॅब’ने ED कार्यालयात

 

Pune News | पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू