
Maharashtra Rain Update | आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | पुणे (Pune), मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) या उपनगरांमध्ये जोरदार पाऊस (Maharashtra Rain Update) झाला आहे. कोकणातही मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही (Western Maharashtra) काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देखील जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून पुण्यात पावसाची रिपरिप दिसून आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणासह (Konkan) पश्चिम महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Rain Update) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी (Raigad And Ratnagiri) जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर (Pune And Kolhapur) जिल्ह्यासाठी आणि पालघर (Palghar) जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर विदर्भातील गोंदिया (Gondia), गडचिरोली (Gadchiroli), चंद्रपूर (Chandrapur), सातारा (Satara), आणि ठाणे (Thane) जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट आहे.
वसई विरार (Vasai Virar) नालासोपारा येथे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही सखल रस्त्यांवर पाणी साचले आहे. पाण्यातून बाईक चालवताना मोठा त्रास होतो आहे. वसई विरार महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील अनेक गटारांची कामे सुरू केली आहेत. अनेक नाले अपूर्ण असून अनेक नाले रस्त्यापेक्षा उंच असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. तसेच नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे कमबॅक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून यंदा काहीअंशी दुबार पेरणीचे संकट टळले आहे. दुसरीकडे नाशिककरांवर पाणीटंचाईचे संकट टळले आहे.
Web Title : Maharashtra Rain Update | orange alert for rain in western maharashtra including konkan today
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या