Maharashtra Rains | अखेर प्रतीक्षा संपली ! राज्यात सर्वत्र पावसाचं वातावरण, पुणे शहरात सर्वत्र ‘धो-धो’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | राज्यात मोसमी पावसाची (Monsoon) चाहुल लागली आहे. मागील दोन ते तीन दिवस झाले मोसमी पाऊस गोवा आणि कर्नाटक (Goa And Karnataka) सीमेलगत रेंगाळताना दिसत आहे. दरम्यान आता मान्सून आगामी प्रवासासाठी अनुकूल स्थिती निर्माण (Maharashtra Rains) झाली आहे. यामुळे आगामी दोन दिवसामध्ये मोसमी पाऊस दक्षिण महाराष्ट्राचा (South Maharashtra) काही भाग, गोवा त्याचबरोबर मध्य अरबी समुद्रात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तविली आहे. दरम्यान, पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Pune Rains) सर्वत्र धो-धो पाऊस पडतानाचं चित्र पहावयास मिळत आहे.

 

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात स्थिती अनुकूल झाली असून मध्य विषवृत्तीय प्रवाह हळूहळू गतिमान होत आहे. तसेच अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकू लागला असून मान्सूनची वाटचाल उत्तरेकडे सुरू झाली आहे, असं सांगण्यात येत आहे. (Maharashtra Rains)

 

मागील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम किनारपट्टीच्या बारा किलोमीटर उंचीच्या हवेच्या थरामध्ये असलेल्या जोमदार पश्चिमी व दक्षिण पश्चिमी वाऱ्यांमुळे शुक्रवारपासून सोमवारपर्यंत कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आगामी 2 दिवस तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज असून त्यानंतरच्या 2 दिवसांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातही हीच स्थिती असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात येत आहे.

Web Title :- Maharashtra Rains | monsoon in konkan in next two days monsoon Rain in Pune Today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना एकनाथ खडसेंचे उत्तर; म्हणाले…

 

Tata Group च्या ‘या’ स्टॉकमध्ये मिळू शकतो 41% शानदार रिटर्न; दमदार बिझनेस आऊटलुकवर BUY रेटिंग; पहा टार्गेट

 

PM Kisan e-KYC | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसानची e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली; जाणून घ्या