Maharashtra Rains | …म्हणून आगामी 4 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | राज्यात मागील काही दिवसात पावसाचा चांगलाच जोर वाढला होता. मराठवाडा आणि विदर्भाला तर पुर्ण पावसानं झोडपुन काढलं आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडक दिल्यानंतर, आता अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाचा (Cyclone Shaheen alerts) धोका निर्माण झालाय. विशेष म्हणजे शाहीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकणार नाही. ही एक सुदैवाची बाब आहे. तर गुजरातच्या किनारपट्टीवर याचा किंचित परिणाम जाणवणार आहे. हे वादळ पुढील काही तासांत तीव्र रुप धारण करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात (Maharashtra Rains) आगामी 4 दिवस धुव्वाधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे.

आज (शुक्रवारी) कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वत्र येलो अलर्ट (Yellow Alerts) जारी केला आहे. दरम्यान आगामी काही तासांत याठिकाणी मेघर्जनेसह (Maharashtra Rains) वादळी वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, याठिकाणी ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, 5 ऑक्टोबर पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

शाहीन चक्रीवादळाच्या (Cyclone Shaheen alerts) प्रभावामुळे गुजरात आणि सौराष्ट्रच्या किनारी भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
तसेच,आज रात्री किंवा शनिवारी पहाटेपर्यंत शाहीन चक्रीवादळ तीव्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मच्छिमारांना 3 ऑक्टोबर पर्यंत मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याच्या सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असलं तरी, आगामी 4 दिवस राज्यात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, शाहीन चक्रीवादळ (Cyclone Shaheen alerts) सध्या 15 किमी प्रतितास वेगाने भारतीय किनारपट्टीपासून लांब जात आहे.
हे चक्रीवादळ सध्या गुजरातमधील द्वारकापासून पश्चिम उत्तर दिशेला 490 किमी, इराणमधील चारबहार बंदरापासून पूर्व-दक्षिणेला हे चक्रवादळ 450 किमी अंतरावर आहे.
तर आमानच्या मस्कटपासून पूर्व दक्षिणेला 610 किमी अंतरावर हे वादळ आहे. (Maharashtra Rains)

Web Title :- Maharashtra Rains | … So the possibility of torrential rains in Maharashtra in the next 4 days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Brain-Eating Amoeba | मुलाच्या शरीरात शिरला असा ’किडा’, खाऊन टाकले मेंदूच्या आतील सर्वकाही! डॉक्टरसुद्धा वाचवू शकले नाही जीव

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 138 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Lahu Balwadkar | लहू बालवडकर हेच सर्वसामान्य जनतेचे खरे हिरो – प्रवीण दरेकर