Maharashtra Rains Update | राज्यात काही भागात ‘धो-धो’ पाऊस; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत, पावसामुळे शेती पिकांचेही नुकसान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची जोरदार (Maharashtra Rains Update) रिपरिप होती. सध्या मात्र पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, काही भागात पावसाची रिपरिप कायम असल्याचं दिसत आहे. जोरदार पावसामुळे नद्या, नाले, धरणे भरले आहेत. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. विदर्भामध्ये (Vidarbha) पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्या ठिकाणी सर्वत्र जलमय वातावरण आहे.

 

सततच्या पावसाच्या हजेरीने अनेक भागातील शेती पिकांचं मोठं नुकसान (Damage to Agricultural Crops) झालं आहे. दरम्यान, सध्या मुंबईसह, ठाणे, पालघर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कोसळताना दिसत आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. अनेक गावात पाणी शिरलं आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची दैणा दिसून येत आहे. (Maharashtra Rains Update)

 

पुणे (Pune) जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासात तुरळक पाऊस झाला आहे. धरणात येणारे पाणी कमी आहे.
त्यामुळे पाणीसाठ्यात, मागील आठवड्याच्या तुलनेने कमी वाढ होत आहे. तर पानशेत धरण 71 टक्के भरले असून,
वरसगाव धरण 65 टक्के तर टेमघर धरण 55 टक्के भरले आहे. या पावसाळ्यामध्ये आतापर्यंत मुठा नदीत खडकवासला धरणातून 3.34 टीएमसी पाणी सोडले आहे.

दरम्यान, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात देखील सध्या धो-धो पाऊस कोसळताना दिसत आहे.
चिपळूणमध्ये चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे गतवर्षी अतिवृष्टीमुळे चिपळूणला महापूराचा फटका बसला होता.
तेथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं.

 

Web Title :- Maharashtra Rains Update | heavy rains in various parts of
the state huge loss of crops of farmers maharashtra rains

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा