Maharashtra Ready Reckoner Rate 2022 | नवीन घर खरेदी करणाऱ्यांना धक्का ! राज्यात ‘रेडी रेकनर’च्या दरात वाढ; जाणून घ्या सविस्तर (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Ready Reckoner Rate 2022 | नवीन घर घेण्याचे स्वप्न तुम्ही पाहात असाल तर एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) रेडी रेकनरचे नवे दर जारी (Maharashtra Ready Reckoner Rate 2022) केले असून यावेळी राज्यात सरासरी 8.80 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन घर घेणं आता महागणार आहे. कोरोनामुळे (Corona) मागील दोन वर्षापासून रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता राज्य सरकारने नवे दर जारी करुन सर्वांनाच धक्का दिला आहे. केवळ मुंबई (Mumbai) वगळता रेडी रेकनरचे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. हे दर 2022-23 या वर्षासाठी असणार आहेत.

 

 

राज्याच्या ग्रामीण भागात (Rural Areas) सरासरी 6.96 टक्के वाढ लागू होणार आहे. नगरपालिका (Municipality) तसेच नगरपंचायती (Nagar Panchayat) क्षेत्रात 3.62 टक्के वाढ आणि महापालिका (Municipal Corporation) क्षेत्रात 8.80 टक्के वाढ (मुंबई वगळून) लागू करण्यात आली आहे. राज्यात रेडी रेकनरच्या दरात मुंबई वगळता एकूण 5 टक्के सरासरी दरवाढ झाली आहे. तर एकूण दरवाढ 8.80 टक्के इतकी असणार आहे.

बृहन्मुंबई क्षेत्रातील (Brihanmumbai) सरासरी वाढ 2.34 टक्के इतकी आहे. परंतु यामध्ये मुंबईचा समावेश केलेला नाही. यापूर्वी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने (Stamp Duty Department) 2022-23 वर्षासाठी राज्यात रेडीरेकनर म्हणजे जमिनीच्या वार्षिक बाजारमूल्य दरात वाढ प्रस्तावित केली होती. यासाठी शासनाची मान्यता मिळणे अपेक्षित होते. आता राज्य सरकारने याला मंजूरी दिली आहे. यानंतर आत सर्व जल्ह्यांच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून या नव्या रेडी रेकनरच्या दराची अंमलबजावणी होणार आहे.

 

कुठे किती दरवाढ ?

ग्रामीण क्षेत्र – 6.96 टक्के

प्रभाव क्षेत्र – 3.90 टक्के

नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्र – 3.62 टक्के

महापालिका क्षेत्र – 8.80 टक्के (मुंबई वगळता)

राज्याची सरासरी वाढ -5 टक्के (मुंबई वगळता)

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सरासरी वाढ –  2.34 टक्के

 

Web Title :- Maharashtra Ready Reckoner Rate 2022 | maharashtra ready reckoner rate 2022 buying a house will be expensive ready reckoner rates in the state increase by an average of 8.80

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Property Tax Collection | अबब ! इतिहासात पहिल्यांदा मिळकतकरापोटी पुणे महापालिकेच्या तिजोरीत 1845 कोटींचा भरणा

 

Neha Sharma Glamorous Photoshoot | नेहा शर्मानं डीपनेक ड्रेसमध्ये केलं बोल्ड फोटोशूट, कॅमेरामध्ये कैद झाला तिचा बोल्ड अंदाज

 

PMC Building Development Permission | पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे ऐतिहासिक उत्पन्न ! तब्बल 2 हजार कोटीचे मिळवले उत्पन्न; अंदाजपत्रकाच्या सुमारे 170 % उत्पन्न मिळवित रचला ‘इतिहास’