राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ‘शोले’ मधल्या ‘जेलर’सारखी, कोणी वाचलंच नाही : मुख्यमंत्री फडणवीस

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था शोले पिक्चरमधल्या जेलरसारखी झालेली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, कोई बचे तो मेरे पिछे आओ. कोणी वाचलंच नाही, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पैलावन या शब्दावरून आणि वयावरुनही मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टीका केली आहे. बारामती मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

शरद पवारांवर व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘काय अवस्था आहे झाली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची. सगळे राष्ट्रवादी सोडून चालले आहेत. कोणी पक्षात राहायलाच तयार नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था शोले पिक्चरमधल्या जेलरसारखी झालेली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, कोई बचे तो मेरे पिछे आओ. कोणी वाचलंच नाही. परवा पवार साहेब म्हणाले मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे. मी पहिलवान तयार करतो.

पवारसाहेब तुमचा एकही पहिलवान दिसत नाही. या वयातही प्रचार करायला तुम्हालाच फिरावे लागत आहे. असे कोणते पहिलवान तयार केलेत तुम्ही की एकही तुमच्यासाठी मैदानात यायला तयार नाही. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 41 लोक निवडून आले. या निवडणुकीत ते 20 चा आकडा देखील पार करू शकणार नाही.’

गोपीचंद पडळकर यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजप तिकीट देण्यात आले आहे. ते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला असून आतापर्यंत त्यांनी 5 वेळा विजय मिळवला आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या