Maharashtra State Transport Workers Union | एसटी महामंडळाच्या ‘महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटने’ला मोठा धक्का; संघटनेची मान्यताच केली रद्द?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra State Transport Workers Union | मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीवरुन एसटी कामगार ठाम आहेत. दरम्यान कामगारांनी संप बंद करून कामावर हजर राहण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या होत्या. मात्र तरीही कामगार संपावर ठाम असल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काही कामगारांना निलंबित (Suspended) तर काही कामगारांवर बडतर्फीची (Dismiss) कारवाई देखील करण्यात आली आहे. यानंतर एसटी महामंडळ महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेला (Maharashtra State Transport Workers Union) मोठा दणका दिला आहे. औद्योगिक न्यायालयाकडून (Industrial Court) संघटनेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार संघटनेला एक धक्का बसला आहे. (ST Kamgar Sanghatna)

2012 मध्ये महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनेने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता रद्द करावी यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. 1996 पासून झालेल्या पगार करारात योग्य वेतनवाढ न दिल्याने शासकीय कर्मचा-यांपेक्षा अत्यंत कमी वेतनात एसटी कामगारांना काम करावे लागते. तसेच वर्ष 2000- 2008 साली बेसिक कोणतेही वाढ केली नसून फक्त 350 रुपये व्यक्तिगत भत्ता दिल्यानंतर कराराचा कालावधी संपल्यानंतर भत्ता काढून घेण्यात आला होता. म्हणून एसटीतील मान्यता प्राप्त महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांचे हित जोपासले गेले नाही. त्यांचे आर्थिक संरक्षण देखील केले नसल्याचा आरोप करत इंटकने न्यायालयात धाव घेतली होती. (Maharashtra State Transport Workers Union)

राज्यातील एसटी महामंडळातील एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता औद्यौगिक कोर्टाने (Industrial Court) आता रद्द केली आहे. तर, एम. आर. टी. यु. (M. R. T. U.) आणि पी.यु. एल.पी. कायदा (P.U. L.P. Law) 1971 या कायद्यानुसार ही मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संघटनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता संघर्ष चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title : Maharashtra State Transport Workers Union | recognition canceled of maharashtra state transport workers organization of st corporation ST Kamgar Sanghatna

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय