Maharashtra Unlock | ‘या’ तारखेपासून राज्यातील नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरु होणार, राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Unlock |  राज्यात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आली होती. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट ओसत असल्याचे पहायला मिळत आहे. तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने (State Government) राज्यात निर्बंध (Restrictions) लागू केले. परंतु आता रुग्ण संख्या कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने जानेवारी महिन्यात लागू केलेले निर्बंध फेब्रुवारी अखेरीस हटवून महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक (Maharashtra Unlock) केला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

 

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक (State Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. जानेवारी महिन्यात जेवढी संख्या वाढली ती आता कमी झाली आहे.

कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे.
त्यामुळे नाट्यगृह (Theaters), सिनेमागृह (Cinemas), हॉटेल (Hotels), बार (Bar), रेस्टॉरंट (Restaurant)
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरु (Maharashtra Unlock) करण्याकडे कल राहिल, अशी माहिती टोपे यांनी दिली.

 

राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात आता पुन्हा निर्बंध लावले जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती.
सरकार अतिरिक्त निर्बंध लादणार नाही. मात्र येत्या काही दिवसांत ते हळूहळू कमी केले जातील.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांवर चर्चा केली.
दरम्यान काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत आणि प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे हळूहळू राज्यभरात
आणखी शिथिलता केली जाईल, असं टोपे म्हणाले होते.

 

 

Web Title :- Maharashtra Unlock | maharashtra completely unlocked by the end of february all restrictions will be removed say rajesh tope

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | रस्ता ओलांडताना PMPML बसच्या चाकाखाली येऊन ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, बस चालक पोलिसांच्या ताब्यात

 

Lata Mangeshkar Memorial | लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्क येथे नाही तर ‘या’ ठिकाणी होणार, राज्य सरकारने केली घोषणा

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादयक ! राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7142 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी