Maharashtra Weather | महाराष्ट्रात दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather | राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा लागला (Maharashtra Weather) आहे. उन्हामुळे माणसाच्या जीवाची काहीली होताना दिसत आहे. विदर्भात (Vidarbha) तर काहीजण उष्माघातामुळे मृत्यु देखील पावले आहेत. एकीकडे उन्हाचा कडाका तर दुसरीकडे पावसाची (Rain In Maharashtra) स्थिती निर्माण झाली आहे. आता राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) वर्तवण्यात आली आहे.

 

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार आता राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. याचा परिणाम आता राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा यामुळे हवामान बिघडले आहे. (Maharashtra Weather)

दरम्यान, हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर (Krishnananda Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी 21 आणि 22 एप्रिलला विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada), दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Central Maharashtra) आणि दक्षिण कोकणातील (South Konkan) काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचे अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे. याबाबत माहिती होसाळीकर यांनी ट्विटमधून दिली आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather | Two days of unseasonal rains with strong winds in Maharashtra Indian Meteorological Department (IMD)

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा