मनसेला मोठा धक्का, ‘या’ नेत्यानं बांधलं ‘शिवबंधन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उशीरा का होईना निवडणुक लढविण्याची तयारी सुरु करुन उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली असतानाच एक मोठा धक्का पक्षाला बसला आहे. आपल्या धडाकेबाज आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Maharshtra Vidhan sabha 2019: big blow to MNS, Nitin Nandgaonkar join's Shiv sena | Vidhan sabha 2019 : मनसेला मोठा धक्का, नितीन नांदगावकर यांनी हाती बांधले शिवबंधन

उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने ट्विट करुन ही माहिती आज पहाटे दिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे खंदे समर्थक नितीन नांदगावकर हे सोशल मिडियावर नेहमीच ट्रेंडिंग विषय बनले होते. तरुणांमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग असलेले नांदगावकर हे २०१० पासून सक्रीय राजकारणात आहेत. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या प्रश्नांसंबंधीचे, अवैधरित्या वाहन चालवणाऱ्यांना शिक्षा करण्याचे, फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मारहाणीचे, वयोवृद्धांना न्याय दिल्यासंबंधीचे अनेक व्हिडिओ त्यांनी अपलोड केले आहेत.

भष्ट्राचाराच्या विरोधात त्यांनी काढलेल्या मोहिमेमुळे त्यांची अक्षय कुमारच्या ‘गब्बर इज बॅक’ च्या गब्बरशी नांदगावकर यांची तुलना होत होती. असा धडकेबाज नेता शिवसेनेत गेल्याने मनसेला चांगलाच धक्का बसला आहे.

Visit : Policenama.com