‘महाशिवआघाडी’च्या मसूद्याला ‘अंतिम स्वरुप’, आता ‘प्रमुख’,’सर्वेसर्वा’ अन् ‘हायकमांड’ निर्णय घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाशिवआघाडीचे जुळताना दिसत आहे. शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. यानंतर सत्तास्थापनेला वेग येताना दिसत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार महाशिवआघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधीची आज महत्वाची बैठक होती. यात कॉमन मिनिमम प्रोग्रामचा मसूदा तयार करण्यात आला आहे. या मसूद्याला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अंतिम रुप दिले आहे. हा मसूदा हायकमांडला पाठवून यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

एकीकडे शिवसेना-भाजपचे बिनसले असताना महाशिवआघाडीचे जुळताना दिसत आहे. आज तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक सकारात्मक होती हे संकेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट झाले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की राज्यात लवकरात लवकर सत्तास्थापन व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन होईल. सरकारला बाहेरुन पाठिंबा किंवा आतून पाठिंबा हे महत्वाचे नाही. राज्यात लवकर सत्तास्थापन होणे आवश्यक आहे. तसेच मुख्यमंत्रिपदासंबंधित काँग्रेसची कोणतीही मागणी नाही. सर्व निर्णय सर्व पक्षीय एकत्र येऊन घेतील असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

मसुद्यावर निर्णय होण्याबद्दल विजय वडेट्टीवार म्हणाले की, पवार आणि हायकमांडने लवकरात लवकर सत्ता स्थापनेच्या मसूद्यावर निर्णय घेतल्यास लवकरात लवकर निर्णय होईल. मसूद्याला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून अंतिम स्वरुप दिले. आता हायकमांडकडे मसूदा सोपवण्यात येईल. ते यावर निर्णय घेतली. जे काही बदल आवश्यक असतील ते आम्ही मिळून घेऊ.

Visit : Policenama.com