महेंद्रसिंग धोनीचे ‘ते’ 5 मोठे निर्णय, ज्यामुळं आश्चर्यचकित झाले होते ‘फॅन्स’ देखील

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता भारतीय क्रिकेट संघासाठी धोनी खेळताना दिसणार नाही. धोनीच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

2007 टी-20 फायनलचा अंतिम ओवर :

पहिला टी-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी गेलेला भारतीय संघ फायनल मध्ये पोहचला होता. धोनीने फायनल मध्ये पाकिस्तान विरुद्ध शेवटच्या ओवरमध्ये मिसबा-उल-हक समोर जोगिंदर शर्मावर गोलंदाजी करण्याची जिम्मेदार सोपवली होती, तेव्हा दर्शक आश्चर्यचकित झाले होते. पण धोनीचा हा निर्णय योग्य ठरला आणि भारतीय संघ विजयी झाला.

2009 टी-20 वर्ल्डकप मध्ये संघासमवेत पत्रकार परिषद:

विरेंद्र सेहवाग आणि धोनी यांच्या दोघांमधील वादाच्या अनेक अफवा सुरु होत्या. इंग्लडमध्ये झालेल्या 2009 च्या टी-20 वर्ल्डकप सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत धोनी संपूर्ण संघासोबत हजर होता. धोनीच्या या निर्णयाने सगळे दंग झाले होते.

2011 वर्ल्डकप फायनल मध्ये युवराजच्या आधी मैदानात

वर्ल्डकप फायनल चालू असताना युवराजच्या आधी मैदानावर उतरण्याचा एक मोठा निर्णय धोनीने त्या वेळी घेतला होता. धोनीचा हा निर्णयसुद्धा मैलाचा दगड ठरला आणि त्याने विजयी षटकार देखील मारला. भारत 28 वर्षांनी विजेता ठरला होता.

2014 ऑस्ट्रेलिया दोऱ्याच्या वेळी सराव सामान्यातून निवृत्ती :

धोनीचे चाहते आणि क्रिकेटचे जाणकार आश्चर्यचकित झाले होते, जेव्हा धोनीने ऑस्ट्रेलिया दोऱ्याच्या वेळी सराव सामान्यातून निवृत्ती घेतली होती.

15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :

आता सरतेशेवटी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. धोनीने लिहिलं, “आपल्या सर्वांचे प्रेम आणि साथ याबद्दल सर्वांचे आभार. आज रात्री 7.29 वाजल्यापासून मला निवृत्त समजण्यात यावे.”