मकर संक्रांतीला 2 ‘शुभ’ योग, जाणून घ्या तुमच्या राशीवरील ‘शुभ-अशुभ’ प्रभाव !

पोलीसनामा : ऑनलाईन टीम – या वर्षी १४ जानेवारी, मंगळवारी सूर्य उत्तरायण असेल आणि १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा केला जाईल. हिंदूंच्या श्रद्धेनुसार या सणाला खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, १४ जानेवारीच्या रात्री २१ मिनिटांवर सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. मकर राशीत प्रवेश करणाऱ्या सूर्याला मकर संक्रांती म्हणतात. यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आणि बुध एकत्रितपणे बुद्धादित्य योग बनवित आहेत.

१] मेष रास
हा योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असेल. धन लाभ झाल्यामुळे आर्थिक स्थिती बळकट होईल.

२] वृषभ रास
या विशेष योगामुळे वृषभ राशीला यश मिळेल.

३] मिथुन रास
मिथुन राशीसाठी हा योग खूप खास असेल. कामात विजय मिळण्याची शक्यता आहे.

४] कर्क रास
कर्क राशीसाठी हा योग हानिकारक असू शकतो. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

५] सिंह रास
हा योग सिंह राशीसाठी शुभ परिणाम आणू शकतो. तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

६] कन्या रास
हा योग कन्या राशीसाठी सामान्य असेल. तुम्ही आत्मसंतुष्ट व्हाल.

७] तुळ रास
हा योग तुला राशीसाठी बरेच फायदे घेऊन येत आहे. धन लाभ होऊ शकतो.

८] वृश्चिक रास
वृश्चिक राशीसाठी हा योग अशुभ असेल. मतभेद आणि वाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आपण अस्वस्थ होऊ शकता.

९] धनु रास
हा योग धनु राशीसाठीही शुभ असेल. ज्ञान वाढू शकते.

१०] मकर रास
हा योग मकर राशीसाठी शुभ संकेतही देत आहे. यश आणि कार्य वाढेल.

११] कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांचा सन्मान वाढेल. हा योग कुंभ राशीसाठी शुभ ठरणार आहे.

१२] मीन रास
मीन राशीच्या लोकांना थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. एखाद्या गोष्टीची भीती राहू शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/