मलायकाला नाही आवडत अर्जुन कपूरची ‘ही’ सवय, खुद्द अभिनेत्याचा ‘खुलासा’ !

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात लॉकडाऊन असल्यानं सर्व स्टार्स घरातच आहेत. असं असलं तरी ते सोशल मीडियावरून चाहत्यांशी संपर्क साधत असतात. असाच एक अभिनेता आहे तो म्हणजे अर्जुन कपूर. अर्जुन कपूर सोशलवरून सतत चाहत्यांशी बातचित करताना दिसत आहे. नेहमीच सोशलवर काही ना काही अॅक्टीविटी करणाऱ्या अर्जुननं त्याची अशी एक सवय सांगितली आहे जी त्याची गर्लफ्रेंड मलयाका अरोराला आवडत नाही.

अर्जुन कपूर इंस्टारून टूडू गेमच्या साहाय्यानं लोाकांसोबत बातचित करत होता. याचवेली बोलताना अर्जुननं मलायकाला न आवडणारी त्याची सवय सांगितली आहे.

टु़डू गेमच्या माध्यमातून एकानं अर्जुनला सांगितलं की, फोनचा वापर बंद करं. या पोस्टमध्ये अर्जुननं मलायकाला टॅग केलं आणि लिहिलं की, मला माहिती आहे आणखी एक व्यक्ती जी या गोष्टीशी सहमत असेल.

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो पानीपत सिनेमात दिसला होता. हा एक पीरियड ड्रामा होता. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कमाई केली. यानंतर आता लवकरच तो संदीप और पिंकी फरार या सिनेमात दिसणार आहे. 20 मार्च 2020 रोजी हा सिनेम रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं ते काही शक्य झालं नाही.