OIC च्या बैठकीत पाकिस्तानला जबरदस्त झटका, मालदीवनं भारताच्या बाजूनं मांडलं मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्लामिक सहकार संघटनेच्या (OIC)बैठकीमध्ये पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. भारताविरूद्ध इस्लामोफोबियाचा प्रचार करण्याचा पाकिस्तानचा कट अयशस्वी ठरला आहे. ओआयसीच्या बैठकीत मालदीवने भारताची बाजू घेऊन पाकिस्तानला खरे-खोटे सुनावले आहे.

मालदीव म्हणाले की, इस्लामोफोबियाचा भारतावर आरोप करणे चुकीचे आहे. भारतातील सर्वात मोठ्या लोकशाहीत 20 कोटींपेक्षा अधिक मुस्लिम वास्तव्य करतात. मालदीव म्हणाले की, भारतावर इस्लामोफोबियाचा खोटा आरोप दक्षिण आशियामधील धार्मिक सुसंवादला नुकसान पोहचवेल.

दोन दिवसांपूर्वी ओआयसीने पाकिस्तानाचं म्हणणं सांगत असताना भारतात ‘इस्लामफोबिया’ च्या कथित प्रकरणांवर चिंता व्यक्त केली होती. गुरुवारी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ओआयसीला भारताच्या वतीने प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ‘भारत हे मुस्लिमांसाठी स्वर्ग आहे आणि जे हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत ते भारतीय मुस्लिमांचे मित्र होऊ शकत नाहीत’.