पंतप्रधान निवडणूक जिंकल्यानंतर ठरवू

विशाखापट्टनम : वृत्तसंस्था – आम्हाला आमचा नेता निवडता येतो. निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान ठरवणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्पष्ट केले आहे. विशाखापट्टनम येथे एका सभेत बोलताना हे विधान केले आहे. या सभेला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू , काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.

भाजपकडून महागठबंधनला सतत पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरून सवाल केले जात आहे. याविषयी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘आम्हाला आमचा नेता निवडता येतो. निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही तो ठरवूच. मोदी कोण आहेत जे आम्हाला सतत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत प्रश्न करतात.’

तुमचा नेता कोण ? –
महागठबंधनला भाजप व मित्रपक्षांकडून नेहमीच तुमचा नेता कोण ? तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यावरून लक्ष केले जात आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुजरातमधील गांधीनगरमध्ये हजर राहिले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी एनडीएविरोधात महाआघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण, असा सवाल विचारला होता. जसं आम्ही सर्वजण आज एकत्र आलो. तसंच तुम्हीसुद्धा एकत्र येऊन दाखवा आणि एकमुखानं सांगा कोण बनेल तुमचा पंतप्रधान? असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.