चौकशीसाठी आलेल्या पोलीसाची गचांडी पकडून ‘धक्काबुक्की’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या तपासासाठी चौकशीकामी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची गचांडी पकडून त्याला धक्काबुक्की करण्यात आली. माळीवाड्यात आज ही घटना घडली.

अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. इवळे गल्ली, माळीवाडा, अहमदनगर) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कर्मचारी संदीप हेमंत थोरात हे माळीवाड्यातील इवळे गल्लीत गायकवाड याच्या घरी गेले. गुन्ह्याचे तपास कामी त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता थोरात व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ, दमदाटी केली. थोरात यांची गचांडी पकडून धक्काबुक्की केली. थोरात करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी गायकवाड यास ताब्यात घेतले.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी संदीप थोरात यांच्या फिर्यादीवरून अनिल गायकवाड याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विकास वाघ हे तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

 

You might also like