धुळे : साक्रीरोडवर बस अपघातात वृध्द ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गुरवारी दुपारी सव्वा चार वाजे दरम्यान साक्री रोड मच्छीबाजार समोरील रस्त्यावर बडोदाहुन धुळे बस स्थानकात येणाऱ्या गुजरात राज्यातील बस क्रं. जी .जे. 18 झेड 5065 हिच्या समोरुन रस्ता ओलाडुन बाजुला येणारा वृध्द गिरजा वेडुकर यांना ऱस्तावरील असलेला धोकेदायक खड्डा ओलांडताना धक्का लागला.यावेळी ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

वर्दळीची वेळ असल्याने सगळ्यांनी चटकन मदत करत वृध्द नागरीकाला उपचारार्थ चक्कर बर्डी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. डॉक्टरांनी तपासणी करुन वृध्दास मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बस चालक व बस ताब्यात घेतली.व वाहतुक सुरळीत केली. वृध्दाच्या मृत्युची वार्ता मोगालाईल भागात कळताच सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com