धक्कादायक ! ‘हा’ सिनेमा पाहताना थिएटरमध्ये एकाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तेलगु जानू हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शीत झाला. हा चित्रपट समंथा अक्किनेनी आणि शादवानंद यांचा असून आत्तापर्यंत या चित्रपटला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, हा चित्रपट पहाताना एका प्रेक्षकाचा चित्रपट ग्रहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हा व्यक्ती चित्रपट पाहिल्यानंतर मृत्यूमुखी झाल्याची चर्चा आहे. ही घटना हैदराबादमध्ये घडली असल्याचे वृत्त आहे.

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती हैदराबाद येथील गोकुळ सिनेमागृहात जानू हा चित्रपट पहण्यासाठी गेली होती. सिनेमा संपल्यानंतर चित्रपट गृहातील सर्व प्रेक्षक बाहेर पडले. मात्र एक प्रेक्षक खुर्चीतून उठलाच नाही. चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठलाच नाही. चित्रपट गृहातील कर्मचाऱ्यांनी हा प्रेक्षक उठला नसल्याने याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

चित्रपट पहात असताना या प्रेक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याचे समजतेय. संबंधित प्रेक्षकाचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याच्यावजळ कोणतेही ओळखपत्र नसल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसाठी अवघड झाले आहे. पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत व्यक्तीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने किंवा कार्डियाक अरेस्टने झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.