फोनवर बोलता-बोलता ‘या’ ढंगात चोरलं Sanitizer, व्हिडीओ पाहिल्यानंतर आवरणार नाही हासू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे मार्केटपासून घरापर्यंत हँड सॅनिटायजरची डिमांड खुप वाढली आहे. या व्हायरसमुळे भाजीवाले, रेशन दुकानदार सुद्धा हँड सॅनटाईज केल्याशिवाय सामान देत नाहीत. सध्या मोठी मागणी असल्याने बाजारात अनेक प्रकारचे सुगंधी सॅनिटायझर मिळत आहेत. मात्र, या वाईट काळात काही लोक कंजूसपणा देखील करत आहेत आणि सॅनिटायझर मागून काम भागवून घेत आहेत.

https://www.facebook.com/watch/?v=2655890081393666

मागून काम भागवणे ठिक आहे, काही लोक या व्हिडिओतील व्यक्तीसारखे सुद्धा आहेत, जे चारी करून सॅनिटायझर स्टोर करत आहेत आणि गरज भागवत आहेत. आता तुम्ही सुद्धा विचार करत असाल की, हँड सॅनिटायझर ही चोरी करण्याची वस्तू आहे का. तुम्ही काहीही म्हणत असालात तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक मिळाले आहेत. तुम्हीसुद्धा पाहू शकता हँड सॅनिटायझर चोरणार्‍या या व्यक्तीचा हा व्हिडिओ…

हा व्हिडिओ कोनडॉटी आबू नावाच्या फेसबुक पेजवरून 7 ऑगस्टला शेयर केला गेला होता. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती फोनवर बोलत-बोलत येतो आणि आपल्या लुंगीतील रिकामी बाटली काढतो आणि बाल्कनीत ठेवलेल्या सॅनिटायझरची बॉटल उघडून रिकाम्या बाटलीत सॅनीटायझर भरतो. परंतु, कहानीत ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा तो सॅनिटायझर चोरी करून निघत असताना त्याची नजर कॅमेर्‍यावर पडते. आणि मग काय…सर्वप्रथम तो मास्क लावतो, नंतर चोरलेले सॅनिटायझर पुन्हा त्या बाटलीत ओतून रिकामी बाटली लूंगीत लपवून निघून जातो.