मन की बात : PM मोदींनी शेतकऱ्यांचे मन वळवण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्रातील ‘या’ शेतकर्‍याचा केला उल्लेख

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्राच्या कृषीविषयक कायद्याला विरोधी पक्षांनी काळा कायदा म्हणत विरोध दर्शवला आहे. पंजाब आणि हरयाणाचे हजारो शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपला रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे (Mann Ki Baat) केंद्रीय कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. काही शेतकऱ्यांची उदाहरणे देत पंतप्रधानांनी केंद्रीय कृषी कायद्याचे फायदे सांगितले आहेत.

पंतप्रधान मोदी मन की बात’ कार्यक्रमात म्हणाले की, देशात शेती आणि शेतीशी संबंधित गोष्टीसोबत नवे आयाम जोडले गेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या कृषी कायद्यांधील सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधींचे निर्माण झाल्या आहेत. बराच विचार केल्यानंतर भारताच्या संसदेने कृषी सुधारणांना कायद्याचे स्वरुप दिले. या सुधारणांमुळे केवळ शेतकऱ्यांची बंधनेच नष्ट झालेली नाहीत, तर त्यांना नवे हक्क देखील मिळालेत, नव्या संधी देखील उपलब्ध झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा केला उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एक शेतकरी जितेंद्र भोइजी यांचा उल्लेख केला. भोईजी यांनी कृषी कायद्याचा कसा फायदा घेतला हे पंतप्रधानांनी आपल्या मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितले. पंतप्रधान म्हणाले, ‘कायद्यात आणखी एक मोठी गोष्ट आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्याला शेतकऱ्याच्या तक्रारीचे समाधान एका महिन्याच्या आत करावे लागेल अशी तरतूद केली आहे. आमच्या शेतकरी बंधुची समस्या दूर होणारच होती. याचे कारण म्हणजे आमच्याकडे तसे मजबूत कायदा आहे. त्यांनी तक्रार केली आणि काही दिवसांमध्येच त्यांची समस्या दूर झाली आहे.