Advt.

Maratha Reservation | सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा विचार करत नाही – संभाजीराजे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation | मराठा समाजाचे पाच मूलभूत प्रश्न आहेत, जे मी वारंवार सरकारसमोर मांडले आहेत. ते सरकारच्या हातातले विषय आहेत. आरक्षण हे टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. मात्र जे सरकारच्या (Government) हातात आहे ते तर त्यांनी द्यावे. उदा. नियुक्त्या (Appointments), ओबीसींना (OBC Reservation) ज्याप्रमाणे शिक्षणात सवलती मिळतात तशाच सवलती गरीब मराठ्यांना द्या. मात्र, हे सरकार मराठा समजाचा (Maratha Reservation) कोणताच विचार करत नसल्याची खंत छत्रपती संभाजी राजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosle) यांनी बोलून दाखवली. ते पुण्यात बोलत होते.

 

संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) बोलण्याचा अधिकार मराठा समाजातील सर्व संघटनांना आहे. मी देखील अनेकवेळा सरकारला यासंदर्भात सांगितले आहे. आरक्षण हा एक वेगळा टप्पा आहे. ते लगेच मिळू शकत नाही. मात्र, सरकारच्या समोर मी जे पाच मूलभूत प्रश्न (Basic Questions) मांडले होते त्यावर अद्याप मार्ग निघाला नाही. मी शांत बसलोय, लोकसुद्धा विचार करत असतील की राजे शांत का बसले. परंतु वेळ प्रसंगी मी बोलेल. बरोबर नसणाऱ्या अनेक गोष्टी सध्या घडताना दिसत आहेत. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मराठा समाज काही गप्प बसणार नाही.

केंद्र सरकार (Central Government) असो किंवा राज्य सरकार (State Government) असो लवकरात लवकर त्यांनी ओबीसी आरक्षणावर निर्णय घ्यावा.
एम्पिरिकल डाटा (Empirical Data) गोळा करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या. ओबीसींवर अन्याय होऊ नये असे माझं प्रामाणिक मत आहे.

 

Web Title :- Maratha Reservation | government does not consider any demands maratha community said chhatrapati sambhaji raje

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Police Helpline | पोलीस मदतीसाठी डायल 112 योजना ! 7 व्या मिनिटाला मिळणार पोलीस मदत

 

EPFO Withdraw Rule | पीएफ सदस्य दुसर्‍यांदा सुद्धा काढू शकतात कोविड अ‍ॅडव्हान्स, जाणून घ्या काय आहे पद्धत?

 

Multibagger Stock | 25 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 2 वर्षांत केले 30 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात

 

Tesla Plant In India | टेस्लाला आकर्षित करण्यासाठी गुंतली अनेक राज्ये ! महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, तेलंगणा आणि पंजाब यांनी प्लांट उभारण्यासाठी दिलं आमंत्रण

 

Winter Health Tips | चहाऐवजी ‘या’ 3 प्रकारच्या काढ्यांचे करा सेवन, जो बचाव करेल सर्दी-ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून