Vinayak Mete | ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, खा. संभाजीराजेंना टोला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) कायदा (Law) रद्द केल्यानंतर मराठा संघटना (Maratha organization) आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीर खासदार संभाजीराजे यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे. त्यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आंदोलनाची घोषणा केली. तर त्यांच्यापाठोपाठ शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी 26 जून रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. तसेच आमचे आंदोलन (Movement) मूक नसून बोलके असणार आहे, असा टोला त्यांनी खा.संभाजीराजे (Sambhaji Raje) यांना लगावला.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यादरम्यान ते औरंगबाद येथे आले होते. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत (Press conference) विनायक मेटे यांनी खासदार संभाजीराजे यांच्यासह राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

मुळात हे फक्त नाटक होतं
विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी ठाकरे सरकावर (Thackeray government) हल्लाबोल करताना म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार निष्क्रिय (State government) राहिले आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारने न्यायालयात योग्य बाजू मांडली नसल्याने मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द झाले. यामुळे मराठा समजामध्ये संताप वाढत आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली, मुळात हे फक्त नाटक होतं, अशी टीका मेटे यांनी केली.

 

आमचे आंदोलन मूक नाही तर बोलके

विनायक मेटे पुढे म्हणाले, आता राज्याचा दौरा सुरु केला असून नागरिकांचे मार्गदर्शन आणि त्यांच्यासोबत संवाद (Guidance and communication) साधणार आहे. जिल्ह्याभर मेळावे घेतले जाणार आहेत. महसूल कार्यालयावर (Revenue Office) मोर्चे काढले जातील. आमचे आंदोलन मूक नाही तर बोलके असणार आहे, असा टोला त्यांनी खा. संभाजीराजे यांना लगावला.

पहिला मेळावा 26 जून रोजी
शिवसंग्रामच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मेळाव्याबाबतीत माहिती देताना विनायक मेटे म्हणाले, औरंगाबादमध्ये शिवसंग्रामचा पहिला मेळावा घेणार आहे. हा मेळावा 26 जून रोजी घेतला जाणार आहे. शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) स्मृती निमित्त हा मोठा मेळावा असणार आहे. याशिवाय 27 जून रोजी मुंबईमध्ये 10 हजार मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती मेटे यांनी दिली.

मेटेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
माओवाद्यांच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
नाहीतर माओवाद्यांच्या जाळ्यात तरुण अडकू शकतात.
त्यामुळे राज्याला याची मोठी किंमत चुकवावी लागेल.
असा इशारा विनायक मेटे यांनी यावेळी दिला.

Wab Title :-maratha reservation | our andolon will not be silent vinayak mete told to sambhaji raje at aurangabad

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा