बारामती : मराठा समाजाकडून अजित पवार यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा संघटनांनकडून राज्य सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

मराठा समाजाकडून राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानासमोर मराठा समाजाकडून ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले. जेव्हा हे आंदोलन करण्यात आले तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे घरी उपस्थित नव्हते.