Bigg Boss Marathi फेम अ‍ॅक्ट्रेस शर्मिष्ठा राऊतचा झाला साखरपुडा !

पोलीसनामा ऑनलाइन –  मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिनं तेजस देसाई सोबत नुकताच साखरपुडा केला आहे. नाशिकच्या इगतपुरी रिसॉर्टच्या क्लब हाऊसमध्ये मोजक्याच 35 पाहुण्यांच्या उपस्थित हा साखरपुड्याचा कार्यमक्रम पार पडला. या साखरपुड्यादरम्यान लॉकडाऊनचे सर्व नियमही पाळण्यात आले होते असंही शर्मिष्ठानं सांगितलं आहे.

शर्मिष्ठा आणि तेजस यांचा साखरपुडा सोहळा रविवारी (दि 21 जून 2020) पार पडला आहे. तसं तर हा साखरपुडा एप्रिलमध्येच होणार होता परंतु लॉकडाऊनमुळं काहीच शक्य झालं नाही. परंतु आता लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथील झाल्यानं कालच हा साखरपुड्याचा सोहळा पार पडला.

शर्मिष्ठा राऊत आणि तेजस येत्या ऑक्टोबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही.

शर्मिष्ठाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सुखांच्या सरींनी मन हे बावरे मालिकेत काम करत आहे. याआधी तिनं मन उधाण वाऱ्याचे, उंच माझा झोका अशा काही मालिकेत काम केलं आहे. आज काय स्पेशल या शोचंही सूत्रसंचालन तिनं केलं आहे. शर्मिष्ठाला खरी ओळख मिळाली ती म्हणजे बिग बॉसमुळं. पहिल्या पर्वात वाईल्ड कार्डमधू एन्ट्री घेणाऱ्या शर्मिष्ठानं फायनल पर्यंत मजल मारली होती.