काय सांगता ! होय, खरेदी न करता तुम्ही बनू शकता कारचे मालक, ‘मारूती’ देतंय संधी

ADV

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कार खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न आहे परंतु बर्‍याच वेळा पैशांच्या अभावामुळे लोक ते पूर्ण करू शकत नाही. मारूती सुझुकी अशा लोकांना खरेदी न करताही गाडीचे मालक होण्याची संधी देत ​​आहे. वास्तविक, कंपनीने मारुती सुझुकी सबस्क्राईब नावाचा एक प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्राम अंतर्गत आपण नवीन स्विफ्ट, डिजायर, विटारा ब्रेझा, अर्टिगा, बालेनो, सियाझ आणि एक्सएल 6 साठी 12 महिने, 18 महिने, 24 महिने, 30 महिने, 36 महिने, 42 महिने आणि 48 महिन्यांसाठी सदस्यता (सबस्क्राइब) घेऊ शकता.

जर सोप्या भाषेत समजायचं असेल तर आपण या कालावधीत कार आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. कंपनीकडून कार आणि कालावधी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. म्हणजे आपण आपली मर्जीनुसार कार घरी घेऊन जाऊ शकता. या सुविधेअंतर्गत मेंटेनेंस कॉस्ट घेतले जाणार नाही, ना इंश्योरेंस कॉस्ट ग्राहकाकडून घेतला जाणार नाही. त्याचवेळी, डाउन पेमेंट देखील देण्याची गरज नाही. ग्राहकांना केवळ कारचे भाडे द्यावे लागेल. सबस्क्रिप्शन कालावधी संपल्यानंतर ग्राहक बायबॅक पर्यायाची सुविधा घेऊ शकतात.

ADV

आपल्याला ही सुविधा मिळवायची असेल तर सर्व आवश्यक कागदपत्रांसह आपल्याला जवळच्या डीलरकडे जावे लागेल. तसेच, आपण https://www.marutisuzuki.com/subscribe वेबसाइटवर भेट देऊन फॉर्म सबमिट करू शकता. या फॉर्ममध्ये फोन नंबरसह अन्य महत्वाची माहिती आपल्याकडून घेतली जाईल. यानंतर, कंपनी आपल्याशी संपर्क साधेल. सध्या ही सुविधा बेंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि गुरुग्राममध्ये दिली जात आहे. मारुति सुजुकी चे एग्जीक्यूटिव डायरेक्टर (मार्केटिंग एंड सेल्स) शशांक श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, बदलत्या बिजनेस डायनेमिक्स मध्ये अनेक ग्राहकांना सार्वजनिक वाहतुकीतून पर्सनल वाहनांकडे जायचे आहेत. त्यांना असा उपाय हवा आहे ज्याने त्यांच्या खिशावर जास्त ओझे पडू नये. यामुळेच ही योजना सुरू केली गेली आहे.