जनतेनं ‘भगवा’ फडकवला पण शिवसेनेनं तो सोनिया गांधी, पवारांच्या ‘चरणी’ ठेवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवारांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने भाजपचं सरकार विश्वासदर्शक ठरावापूर्वीच कोसळलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर साडेतीन दिवसाचे ‘देवेंद्र सरकार-2’ कोसळले. आता महाविकास आघाडी आपलं सरकार स्थापन करणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. विनोद तावडे म्हणाले, जनतेने, महाराष्ट्र राज्यात भगवा फडकवला, पण तोच भगवा शिवसेनेने सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या चरणी ठेवला. तर मातोश्रीवरून बाहेर न पडणाऱ्यांनी अनेकांच्या पायऱ्या झिजवल्या, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेनेवर आरोप करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेला नंबर गेम लक्षात आला आणि बार्गेनिंग पॉवर वाढल्याचे समजल्याने जे काधीच ठरले नव्हते, त्याबाबत शिवसेनेने दिली, तरीही भाजपने सात्विक भूमिका घेतली. परंतु शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करु लागली, असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला उद्या सायंकाळी पाच पर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र, भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

Visit : Policenama.com