विलेपार्ले स्टेशन परिसरात इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीत काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचावकार्य सुरु आहे. ही आग लाभश्री व्हिला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर लागली आहे.

विलेपार्लेच्या बजाज रोडवरील ही घटना असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिकांनी आगीमध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केल्याने अग्निशमन दालाचे काही जवान इमारतीत जाऊन कोणी अडकले आहेत का याचा शोध घेत आहेत. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/