अण्णा बनसोडे यांना मातंग एकता आंदोलनचा पाठिंबा जाहिर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेने पाठिंबा जाहिर केला आहे. पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना विजयी करण्याचे आवाहन मातंग एकता आंदोलन संघटनेने केले आहे.

मातंग एकता आंदोलनचे संस्थापक माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे व कार्याध्यक्ष अविनाशभाऊ बागवे यांच्या आदेशानुसार हा पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. यासंबंधीच्या पत्रावर मातंग एकता आंदोलन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष दत्तू चव्हाण, कार्याध्यक्ष मोहनशेठ वाघमारे, उपाध्यक्ष दत्ता थोरात, महासचिव विठ्ठल खलसे, सचिव कैलास पाटोळे, उपाध्यक्ष सचिन दुबळे, शिवाजी गायकवाड, सचिव दशरथ सकट, खजिनदार साहेबराव थोरात, महिला अध्यक्ष आशाताई सहाणे, तसेच कार्यकर्ते रवींद्र गायकवाड, गणेश जाधव यांच्या सह्या आहेत.

मातंग समाजाच्या विकासासाठी माजी आमदार अण्णा बनसोडे नेहमीच कार्यरत राहिले आहेत. यापुढेही समाजाच्या विकासासाठी ते कार्यरत राहतील असा विश्वास मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेने व्यक्त केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

You might also like