२ लाख रुपयांची लाच घेताना माथाडी बोर्डाचा सचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – न्यायालयात सोयीप्रमाणे अहवाल सादर करण्यासाठी किराणा बाजार व दुकाने मंडळ बोर्डाचा सचिव तथा सरकारी कामगार अधिकाऱ्याला २ लाख रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. गुरुवारी अ‍ॅन्टी कप्शनच्या ठाणे परिक्षेत्राच्या पथकाने ही कारवाई केली. मंगेश झोले असे य़ा अधिकाऱ्याचे नाव आहे.

किराणा बाजार मंडळाच्या अखत्यारित काम करणाऱ्या एका टोळीच्या सभासद कामगारांच्या नेमणूक आदेशाविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. या दाव्यात हवा तसा अहवाल सादर करण्यासाठी मंगेश झोले याने ७ लाख रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शनकडे याची तक्रार केली. त्यानंतर तडजोडीअंती झोले यांनी ६ लाख निश्चित केले. याची पडताळणी केल्यावर झोले यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने गुरुवारी सापळा रचला आणि झोले यांना २ लाख रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like