दर्श (मौनी) अमावस्येत पितृ दोषातून मुक्त होण्यासाठी करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माघ महिना हा सर्वात महत्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात येणारी अमावस्या माघ आणि मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी गंगा स्नानास विशेष महत्त्व आहे. यावर्षी ही आमावस्या 24 जानेवारी रोजी आहे. या दिवशी शनि आपली राशी बदलून मकर राशीत प्रवेश करेल. असे मानले जाते की या दिवशी गंगा स्नानानंतर पूर्वजांना पाणी दिल्याने त्यांचा आत्मा तृप्त होतो, म्हणून या पवित्र दिवशी तीर्थक्षेत्रांवर पिंडदान केले जाते. मौनी अमावस्यावरील पितृ दोष शांततेसाठी कोणते उपाय केले पाहिजेत, त्यासंदर्भात जाणून घ्या.

पितृ दोषातून मुक्त होण्यासाठी एका तांब्यात पाणी घ्या व त्यामध्ये लाल फुल व काळे तीळ घाला, मग हे पाणी पूर्वजांचे ध्यान करताना सूर्यदेवाला अर्पण करा. असे केल्यावर पितृ दोष मुक्तीसाठी प्रार्थना करा. या दिवशी पित्रांसाठी भोजन तयार करा, ज्यात प्रथम जेवण गायीला द्यावे आणि दुसरे कावळ्याला द्यावे. असे केल्याने तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तसेच या दिवशी, पिंपळाच्या झाडाखाली पूर्वजांसाठी तूप दिवे लावा. हे देखील पितृ दोष शांत करते. या दिवशी पींपळाच्या झाडाखाली जूटच्या कुशच्या आसनावर बसून ‘ऊं ऐं पितृदोष शमनं हीं ऊं स्वधा’ मंत्राचा जप करावा. या मंत्राच्या 1, 3 किंवा 5 वेळा माळेचा जप करावा.

या दिवशी दोन जानवं घ्या, ते तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या नावाने एक आणि भगवान विष्णूच्या नावाने एक अर्पण करा. यानंतर, पिंपळाच्या झाडाला 108 वेळा परिक्रमा घाला आणि पांढऱ्या रंगाचा गोड पदार्थ पिंपळाच्या झाडाला अर्पित करा. तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला सात प्रकारची धान्ये किंवा तिळापासून बनवलेल्या वस्तू दान करा. असे केल्याने तुमचे पूर्वज आनंदी होतील.

फेसबुक पेज लाईक करा –