Maval Lok Sabha Election 2024 | ज्यांनी केला अजितदादांच्या ‘पार्थ’चा पराभव, त्यांचाच प्रचार करण्याची येणार ‘पिता-पुत्रा’वर वेळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maval Lok Sabha Election 2024 | राजकारणात काहीही घडू शकते, याचा अनुभव सध्या मावळमधील जनता घेत आहे, राजकारणाच्या या चिखलात नेमकं हे काय चाललंय, असा प्रश्न अनेकांना इथे पडलाय. कारण लोकसभेच्या मागील निवडणुकीत मावळमध्ये अजित पवार (Ajit Pawar) आपला पूत्र पार्थच्या (Parth Pawar) विजयासाठी जीवाचं रान करत होते, पण अखेर श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचा विजय झाला होता. आता हेच पित्रा-पुत्र श्रीरंग बारणेंच्या प्रचाराला उतरणार आहेत.(Maval Lok Sabha Election 2024)

मागील काही वर्षांपासून राज्यात भाजपाने इतक्या राजकीय घडामोडी घडवून आणल्यात की कोण कोणत्या पक्षात, आणि कोण-कोणाच्या गटात हेच कळत नाही. आज सर्वधर्म समभाव मानणाऱ्या पक्षात असलेला नेता उद्या कट्टर धर्मांध पक्षात दाखल होतो, आणि जोरजोरात धार्मिक नारे देत आपल्या नव्या मालकाला खुश देखील करू लागतो, हे चित्र आता महाराष्ट्रात रोजचेच झाले आहे.

मागील काही वर्षात राज्यातील काही प्रमुख पक्ष अतिशय नाट्यमयरित्या भाजपाने (BJP) फोडल्याने एकुणच सर्वच शहरातील, तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. उमेदवारीसाठी आढळराव पाटलांसारखा (Shivajirao Adhalrao Patil) एक नेता आता मित्रपक्षात सहज दाखल होत आहे, मात्र कोणालाच त्याचे विशेष वाटत नाही.

असाच काहीसा अनुभव मावळमधील लोक घेत आहेत. सर्वसामान्य माणसाला हे सोयीचं, अनितीचं राजकारण समजेनासं झालं आहे.

मावळमधून खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत.
बारणे २२ एप्रिल रोजी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत.
गत निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी आणि पराभूत उमेदवार पार्थ पवार यांनाही त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी
निमंत्रण देणार असल्याचे म्हटले आहे. ज्यांच्याकडून पराभव झाला त्यांच्याच प्रचारासाठी पार्थ पवार येणार असल्याची
चर्चा मावळ मतदारसंघात आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये पार्थ पवार यांचा तब्बल २ लाख १५ हजार ९१३ मतांनी पराभव बारणे यांनी
केला होता. आता श्रीरंग बारणेंचा सामना महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांच्याशी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | साताऱ्यातून अखरे उदयनराजे भोसलेंना भाजपाची उमेदवारी; भोसले विरूद्ध शिंदे सामना रंगणार

Vadgaon Sheri Pune News | पुणे : बागेत खेळणाऱ्या लहान मुलांसोबत अश्लील कृत्य, नारधमास अटक

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामतीसाठी अजित पवारांनीही घेतला उमेदवार अर्ज, हा प्लॅन ‘बी’ आहे की ‘ए’, राजकीय वर्तुळात चर्चा