24 मे : जेव्हा 16 वर्षापूर्वी ‘या’ देशानं मोबाईल फोनवर आणली बंदी, वाचा आजचा इतिहास

नवी दिल्ली : देशात मुस्लिम शिक्षणाचे सर्वात मोठे आणि मुख्य केंद्र मानल्या जाणार्‍या अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयाची स्थापना 1920 मध्ये 24 मे रोजी झाली होती. त्याकाळात थोर समाजसुधारक सर सैयद अहमद खान यांनी मुस्लिमांना आधुनिक शिक्षण देण्याची गरज ओळखून 1877 मध्ये एका शाळेची स्थापना केली होती, जी नंतर मुस्लिम अँग्लो ओरिएन्टल कॉलेज बनली. हेच कॉलेज पुढे 1920 मध्ये अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालय बनले. हे स्वातंत्र्यानंतर देशातील चार केंद्रीय विश्वविद्यालयांपैकी एक होते. जागाच्या इतिहासात 24 मे या तारीखेला अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत, त्या आपण जाणून घेवूयात.

1543 : पोलंडचे खगोलतज्ज्ञ निकोलस कॉपरनिकस यांचे निधन, ज्यांनी पृथ्वीसह सर्व ग्रह सूर्याला फेर्‍या मारतात आणि पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते, ज्यामुळे ऋतू येतात आणि जातात हा सिद्धांत प्रथम मांडला.

1689 : ब्रिटिश संसदेने प्रोटेस्टन्ट इसाईंना धार्मिक स्वतंत्र्याची खात्री दिली.

1875 : सैय्यद अहमद खान यांनी अलीगढमध्ये मुहम्मदीन अँग्लो ओरिएन्टल स्कूलची स्थापना केली, जे सध्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे.

1883 : ब्रुकलिन आणि मॅनहट्टनला जोडणारा ब्रुकलिन ब्रिज वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.

1915 : थॉमस अ‍ॅल्वा एडिसन यांनी टेली स्क्राइबचा शोध लावला.

1931 : पहिली एसी प्रवासी रेल्वे अमेरिकेच्या वाल्टमोर ओहियो मार्गावर धावली.

1959 : साम्राज्य दिवसाचे नाव बदलून राष्ट्रमंडल दिवस केले.

1985 : बांगलादेशात चक्रीवादळामुळे दहा हजार लोकांचा मृत्यू.

1986 : मार्गारेट थॅचर इस्त्रायलचा दौरा करणार्‍या ब्रिटनच्या पहिल्या पंतप्रधान बनल्या.

1994 : मीना (सौदी अरब) मध्ये हज शी संबंधीत एका कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याने 250 पेक्षा जास्त हज यात्रेकरूंचा मृत्यू.

1994 : न्यूयॉर्क सिटीत 1993 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर बॉम्ब हल्ला करणार्‍या चार आरोपींमधील प्रत्येकाला 240 वर्षांचा कारावास सुनावला.

2000 : इस्रायलने दक्षिण लेबनान वर आपला 18 वर्ष जुना अधिकार समाप्त केला आणि तेथून आपले लष्कर मागे घेतले.

2001 : नेपाळचे 15 वर्षीय शेरपा तेंबा शेरी माऊंट एव्हरेस्ट सर करणारे सर्वात कमी वयाचे गिर्यारोहक ठरले.

2004 : उत्तर कोरियाने मोबाईल फोनवर प्रतिबंध लावला. मात्र, काही वर्षानंतर ही बंदी हटवण्यात आली.