MBA च्या विद्यार्थ्यीनीचे अपहरण करुन सामुहिक बलात्कार

बुंलेद : वृत्त संस्था – उत्तर प्रदेशातील बुंलेद शहरातील एमबीएच्या विद्यार्थ्यीनीचे अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तिच्या चेहऱ्यावर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. अत्याचार केल्यानंतर तिला रस्त्यावर टाकून देऊन आरोपी फरार झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, एमबीएची ही विद्यार्थीनी हापुड येथील गढमुक्तेश्वर येथील राहणारी आहे. गुरुवारी ती मेरठ येथील कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे गेली होती. रात्री घरी परत न आल्याने घराच्यांनी तिचा शोध सुरु केला. पण मोबाईलवर संपर्क होत नसल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तिचा शोध सुरु केल्यावर मेरठजवळील एका ठिकाणी ती रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळून आली.

याबाबत पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही विद्यार्थीनी बसने घरी जात असताना वाटेत बस खराब झाली. त्याचवेळी एका कारमधून चौघे जण जात होते. त्यांनी तिला लिफ्ट देण्याचा बहाणा केला व तेथून तिला चांदपूर पुठीला घेऊन गेले. तेथे तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

या विद्यार्थीनीने विरोध केल्यावर तिच्या चेहऱ्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आले. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. बलात्कार केल्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत तिला रस्त्यावर टाकून देण्यात आले होते. सध्या या विद्यार्थीनीला मेरठमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

You might also like