चिनी सैन्य डोकलाममध्ये पुन्हा घुसलं का ? परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टीकरण द्यावं, BJP च्या ‘या’ खासदाराची मागणी

ADV

पोलिसनामा ऑनलाईन – डोकलाममध्ये चीनने पुन्हा प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. त्यावरुन भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. गलवान खोर्‍यातील संघर्षावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. दररोज सरकारला प्रश्न विचारले जात आहे. गलवान खोर्‍यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न होत असताना भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

ADV

स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. अमेरिकन माध्यमातील सूत्रांनी म्हटले आहे की, मागील वर्षी चीनने भारतासोबत डोकलाम संदर्भात केलेला करार रद्द केला आहे. ज्या करारानंतर भारताने विजय झाल्याचा दावा केला होता. चीनने भूतानमधून सैन्य माघारी बोलोवले होते. मात्रा, चिनी सैन्याने पुन्हा डोकलाममध्ये पुन्हा घुसखोरी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दल स्पष्टीकरण दिले पाहिजे अथवा ते निराधार असल्याचे सांगितले पाहिजे असे, सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. सध्या भारत-चीन सैन्य गलवान खोर्‍यात आमनेसामने आले आहेत. संघर्षातून 20 भारतीय जवान हुत्मामा झाले होते. गलवान खोर्‍यातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच डोकलाममध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.