Medical Abortion | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ महिलांना 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारनं (Central Government) गर्भपाताशी संबंधित नवीन नियम अधिसूचित केले आहे. याअंतर्गत विशिष्ट श्रेणीच्या महिलांच्या वैद्यकीय गर्भपातासाठी (medical abortion) गर्भधारणेची वेळ-मर्यादा 20 आठवड्यावरुन 24 आठवड्यापर्यंत (अंदाजे 5 महिन्यापासून 6 महिन्या पर्यंत) वाढवण्यात आली आहे. गर्भधारणेची वैद्यकीय समाप्ती (medical termination of pregnancy)(सुधारणा) नियम, 2021 नुसार, विशेष श्रेणीत लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार (rape) किंवा अनैतिकतेला बळी पडलेल्या महिला, अल्पवयीन मुली, ज्या महिलांची वैवाहिक स्थिती गर्भधारणेदरम्यान (Medical Abortion) बदलली आहे (विधवा किंवा घटस्फोटित) आणि ज्या स्त्रियांना अपंगत्व आहे किंवा आले आहे, अशा महिलांचा केंद्र सरकारने यामध्ये समावेश केला आहे.

या श्रेणीतील महिलांचा समावेश
नवीन नियमानुसार, मानसिकदृष्ट्या आजारी महिला, गर्भाला कोणतीही विकृती किंवा आजार असणं ज्यामुळे मुलाचं किंवा होणाऱ्या आईचं जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे किंवा जन्मानंतर अशा मानसिक किंवा शारीरिक विकृतीची (Physical deformity) शक्यता असते, गंभीर अपंगत्व येण्याची शक्यता आहे, गर्भवती (Medical Abortion) महिला मानवी संकट क्षेत्र किंवा आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत असल्यास त्यांना या श्रेणीत समाविष्ट केल्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे.

नवे नियम मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (सुधारणा) विधेयक 2021 अंतर्गत अधिसूचित करण्यात आले आहेत. हे विधेयक मार्चमध्ये संसदेत पारित झाले.

जुना नियम

जुन्या नियमांनुसार 12 आठवड्यापर्यंत (अंदाजे 3 महिने) गर्भधारणेची समाप्ती करण्यासाठी एका डॉक्टरांचा सल्ला आवश्यक होता आणि 12 ते 20 आठवड्यांदरम्यान (अंदाजे 3 ते 5 महिने) गर्भधारणा वैद्यकीय संपुष्टात आणण्यासाठी दोन डॉक्टरांचा सल्ला आवश्यक होता.

नवी नियम
गर्भाला कोणतीही विकृती किंवा रोग (Disease) आहे, ज्यामुळं त्याचं जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे किंवा जन्मानंतर, अशा मानसिक किंवा शारीरिक विकृतीला कारणीभूत असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गंभीर अपंगत्व येण्याची शक्यता आहे, या परिस्थितीत 24 आठवड्यानंतर (6 महिने) गर्भपात बाबत निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय वैद्यकीय मंडळ (Medical Board) स्थापन केले जाईल. (Medical Abortion)

निर्णय वैद्यकीय मंडळ घेईल
जर एखादी महिला गर्भपाताची विनंती घेऊन आली, तर तिचं आणि तिच्या अहवालाचं परीक्षण (Examination of the report) करणं
आणि अर्ज प्राप्त झाल्याच्या तीन दिवसांच्या आत गर्भपाताला परवानगी द्यायची की नाही, याबाबत निर्णय देण्याचे काम हे वैद्यकीय मंडळाचं असेल.

महिलेचे समुपदेशन केले जाईल
मंडळानं गर्भपात करण्यास परवानगी दिली तर, अर्ज मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या
आत संपूर्ण प्रक्रिया सुरक्षितपणे (Counseling) पूर्ण होईल आणि महिलेचे योग्य समुपदेशन केले जाईल, याची काळजी घेण्याचे काम या मंडळाचे असेल.

Web Title :- Medical Abortion | Central government allows certain categories of women to have abortions for up to six months

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांची ‘लुकआऊट नोटीस’

Kidney Health | ‘किडनी डॅमेज’ करू शकतात तुमच्या ‘या’ 7 वाईट सवयी, लवकरच सुधारणा करा

Diabetes | डायबिटीज रुग्णांनी आवश्य खावी ‘ही’ वनस्पती, ब्लड शुगर होईल नियंत्रित; जाणून घ्या