शिल्पा शेट्टीच्या ‘सरोगेसी’ वर शाहीद कपूरची पत्नी मीराचा ‘निशाणा’, म्हणाली – ‘फिगर बद्दल एवढा काय विचार करायचा’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि योगा क्वीन शिल्पा शेट्टी 15 फेब्रुवारी 2020 रोजी सरोगेसीनं दुसऱ्यांदा आई झाली. आजकाल सरोगेसीनं पॅरेंट होणं एक ट्रेंड झाला आहे. किंग खान पासून तर करण जोहर पर्यंत अनेकजण सरोगेसीनं पालक झाले आहे. शिल्पा शेट्टी आई झाल्यानंतर सतत चर्चेत येताना दिसत आहे. कोणी शिल्पाला शुभेच्छा देत आहे तर कोणी तिच्यावर टीका करत आहे.

अलीकडेच बॉलिवूड स्टार कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेल हिनं तिच्यावर निशाणा साधत मुलांना दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता. यानंतर आता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतनंही तिच्यावर निशाणा साधला आहे. अ‍ॅक्ट्रेस आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी सरोगेसीनं आई बनतात असं तिनं म्हटलं आहे. मीरानं नेहा धुपियासोबत बायो ऑयल प्रेगाथॉन कॅम्पेनमध्ये भाग घेतला होता. यावेळी मीरानं आपली प्रेग्नंसी जर्नी सांगितली. बोलता बोलता तिनं शिप्लावर निशाणा साधला.

मीरा राजपूत म्हणाली, “मी माझ्या दोन्ही मुलांची देखभाल करून खुश आहे. तुमच्यासाठी मुलाची जबाबदारी खूप मोठी असते. जेव्हा तुम्हाला दोन मुलं असतात तेव्हा जबाबदारी आणखी वाढते. माझ्याकडे शाहिदसारखा पार्टनर आणि कुटुंब आहे जे मला सपोर्ट करतं.”

मीराला प्रेग्नंसी जर्नीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा मीरा म्हणाली, “आई बनणं एवढं सोपं नाही. त्या काळात महिलांच्या शरीरात खूप सारे बदल होतात. शरीरात फॅट वाढतं. परंतु याचा अर्थ असा नाही की, सरोगेसीनं आई व्हावं. प्रेग्नंसीनंतरही आपण आपली बॉडी शेपमध्ये ठेवू शकतो. फिगरबद्दल एवढा काय विचार करायचा.”