कोकणच्या विकासासाठी तज्ज्ञांच्या समितीचा अंतिम अहवाल येताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : शरद पवार

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात होते. जाताना त्यांनी आंबोली येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यावेळी शरद पवार म्हणाले, कोकणचा विकास करण्यासाठी तज्ञांची समितीचे अभ्यास सुरु आहे. या समितीने कोकणात विकासाच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत घेऊन काही केंद्र उभी होऊ शकतात असा सल्ला दिला आहे. त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे ठेवला जाणार आहे. आणि त्यातून कोकणच्या विकासाची दिशा ठरवली जाणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तसेच आपण फलोत्पादन योजना कोकणात दिली, पण नंतर त्याचे काहीच झाले नाही. आता कोकणाच्या बाबतीत केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची शाखा पुणे येथील विद्यापीठात आहे. त्यामध्ये काही तज्ज्ञ काम करतात, त्या तज्ज्ञांच्या माध्यमातून कोकण विकासाचा अभ्यास केला जाईल, ही समिती येथील पारंपरिक व्यवसायाव्यतिरिक्त अन्य काही विकासाच्या प्रयोग करता येतील का याचा अभ्यास करून आपला अंतिम अहवाल राज्य सरकारकडे देतील. त्या अहवालानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन कोकण विकासाला दिशा दिली जाईल,असे शरद पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, भाजपचे नेते सुरक्षा व्यवस्थेवरून सरकारवर टिका करत आहेत. पण भाजपच्या नेत्यांच्याच फक्त सुरक्षा काढल्या नाहीत तर सरकारमधील काही मंत्र्याच्याही सुरक्षाही काढल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या टिकेला अर्थ नाही. सुरक्षा कोणाला द्यायची आणि काढायची हे आम्ही ठरवत नाही, तर पोलिसांची एक समिती ठरवत असते. त्यांच्या अहवालानुसार सुरक्षा वाढ व कमी केल्या गेल्या आहेत.मात्र केंद्र सरकारने भाजपच्या नेत्यांना सुरक्षा पुरवल्या असतील तर त्यांचे सरकार आहे, असेही ते म्हणाले. तर भाजपच्या काही नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील असे म्हटले होते. पण, यावर पवार यांनी राणेपासून धोका का असे म्हणत शाब्दिक टिपण्णी दिली. तसेच पोलीस ठरवतील त्यांना सुरक्षा द्यायची की नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.