उध्दव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांचं ‘स्मित हस्य’, मग ठरलं ? निर्णय मात्र ‘गुलदस्त्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेकडून राष्ट्रवादीला शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा त्यासाठी पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शरद पवारांबरोबर पहिलीच भेट मुंबईत ताज लांड्स एन्डवर पार पडली. शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव देण्यात आला आहे. पाठिंब्यासाठी शरद पवारांना विनंती करण्यात आली आहे. परंतू बैठक पार पडल्यानंतर कोणत्याही पक्षांच्या नेत्यांकडून प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यास टाळण्यात आल्या. परंतू आता बैठकीनंतर काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. उध्दव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर शरद पवार हे हॉटेलमधून बाहेर पडले. त्यावेळी पवारांनी स्मित हास्य केलं. त्यावरून सत्तेची सर्व समीकरण जुळली असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. सत्ता वाटपात कोणाला काय द्यायचं हे अद्यापही गुलदस्त्याच आहे.

या बैठकीदरम्यान दिल्लीत सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत काय निर्णय होणार यावर सर्व काही आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आघाडीत आहेत. या बैठकीवर आधारित आहे की आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला पाठिंबा शिवसेनेला देणार की नाही ?

पाठिंबा दिला तरी सत्ता स्थापनेनंतर वाटाघाटी काय होणार हे अजून अस्पष्ट आहे. परंतू शरद पवार शिवसेनेला पाठिंबा देण्यात अनुकूल असल्याचे सध्या तरी दिसत आहे. राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांचा हट्ट आहे की राज्यात काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा, परंतू आता काँग्रेसच्या हायकमांडवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

Visit : Policenama.com