मेहबुबा मुफ्तीच्या मुलीचा ‘खुलासा’ ! आईला ‘चपाती’मध्ये लपवून पाठवत होती ‘मेसेज’

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष महबूबा मुफ्ती मागील वर्षाच्या ऑगस्टपासून अटकेत आहेत. तेव्हापासून महबूबा यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती त्यांचे ट्विटर अकाउन्ट चालवत आहे. गुरुवारी इल्तिजाने ट्विटरवर एक पोस्ट शेयर करून अटकेदरम्यान ती आपल्या आईला कशाप्रकारे मेसेज पाठवत होती हे सांगितले.

मागच्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात येऊन विशेष दर्जा मागे घेतला गेला. यानंतर माजी मुख्यमंत्री महबूबा यांना अटक करण्यात आली. 20 सप्टेंबरपासून महबूबा यांची मुलगी इल्तिजा त्यांचे ट्विटर अकाउन्ट चालवत आहे.

आईने सहा महिने तुरूंगात कसे काढले याबाबत इल्तिजाने लिहिले आहे. तिन लिहिले आहे की, मी तो आठवडा कधीच विसरू शकत नाही जेव्हा तिला जेलमध्ये टाकले…मी पुढील काही दिवस खूप अस्वस्थ होते, यानंतर मला ती चिठ्ठी टिफिन बॉक्सच्या आतमध्ये मिळाली, ज्यामधून तिच्यासाठी जेवण पाठवले जात होते. चिट्ठी चपातीच्या आतमध्ये लपेटून तिच्यापर्यंत पाठवली जात होती.

इल्तिजाने आपल्या आईच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले की, बरोबर सहा महिन्यापूर्वी, मी असहायतेने पहात होते जेव्हा अधिकारी माझ्या आईला घेऊन गेले. दिवस आठवड्यांमध्ये बदलले आणि आठवडे महिन्यांमध्ये. काश्मीरमध्ये अजूनही राजकीय नेते बेकायदेशिरपणे कारागृहात आहेत. हे एक वाईट स्वप्न आहे. सरकार आपल्याच लोकांचा आवाज दाबत आहे. भारताच्या विचारांवर हल्ला होत आहे आणि या दरम्यान गप्प बसणे हा गुन्ह्यातील सहभाग आहे. या संकटाने आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या काश्मीरला कमजारे केले आहे. अजून काहीही बदललेले नाही. सत्य तर हे आहे की, भारताच्या विचारावर हल्ला होतो आणि यावेळी शांत बसणे हे गुन्ह्यात सहभागी होण्यासारखे आहे.

You might also like