जास्त मटण खाल्ले नाही म्हणून मित्रावर पेट्रोल टाकून पेटविले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मटण खाण्यास मित्राला घरी बोलावून घेतले. जास्त मटण खाल्ले नाही याचाच राग आल्याने दोघांनी मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यामध्ये भाजून गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरुन बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर या दोघांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, काल रात्री बापू हराळ व ज्ञानदेव कुसळकर या दोघांनी घरी मटण खाण्यासाठी बोलावून घेतले. मित्राने जास्त मटण खाण्यास नकार दिला. त्यामुळे हराळ व कुसळकर यांना राग आला. मित्राला गावातील रामेश्वर मंगल कार्यालयात आणले. तेथे बापू हराळ याने धारदार शस्त्राने वार केले व पेट्रोल टाकून पेटवून दिले. कुसळकर याने हराळ यास चिथावणी दिली.

भाजून गंभीर जखमी झालेल्या मित्राला उपचारासाठी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.त्यांनी दिलेल्या जबाबावरुन नगर तालुका पोलीसांनी बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत हे करीत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

 

Loading...
You might also like