Health Tips : दिवसाची सुरुवात करा एक ग्लास मेथीच्या पाण्यासोबत, शरीराला होतील ‘हे’ 10 फायदे, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – मेथीदाणे आरोग्यासाठी खुप लाभदायक आहेत. मेथीदाण्यात अँटी ऑक्सीडेंट्स आणि सूज राखणारे गुण आहेत. केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी हे उपयुक्त आहे. जर तुम्हाला मेथीदाणे रोजच्या जेवणात वापरायचे नसतील तर ते वापरण्याच्या वेगळ्या पद्धती सुद्धा आहेत. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेथी पाण्याचे सेवन करावे. मेथी पाणी घरी सहज तयार करता येते.

असे तयार करा मेथी पाणी
कोणत्याही कढईत मेथीदाणे टाका. यानंतर गॅसवर ठेवून दोणे भाजून घ्या. भाजल्यानंतर त्यांची पावडर तयार करा. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मेथीदाणे पावडर मिक्स करा. आता तुमचे मेथी पाणी तयार झाले. आरोग्याचे फायदे मिळवण्यासाठी रोज सकाळी हे पाणी प्या.

मेथी पाणी पिण्याचे फायदे

1 दिवसभर उर्जा मिळते.
2 वजन नियंत्रणात राहाते.
3 पोट भरलेले वाटत असल्याने जास्त कॅलरीज सेवन केल्या जात नाहीत.
4 ब्लॉटिंगपासून दिलासा मिळतो.
5 केसांच्या वाढीसाठी लाभदायक.
6 केसातील डँड्रफ, कोरडेपणा दूर होतो.
7 शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.
8 अपचनाची समस्या दूर होते.
9 डायबिटीजमध्ये लाभदायक आहे. ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहाते.
10 किडनीचे आरोग्य वाढते.