मेट्रो लोणी काळभोर पर्यंत धावणार ?

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन – स्वारगेट पासून हडपसर पर्यंत असलेल्या मेट्रोला लोणीकाळभोर पर्यंत पुढे वाढविण्याचा निर्णय आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखड्यानुसार हा मार्ग स्वारगेट ते हडपसर होता. तो बदलून नविन मार्गाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केल्या. आज पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली. शिरुर लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. कोल्हे यांनी शुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात सुरू असलेली विविध विकासकामे, नव्याने सुरू करावयाची कामे याचा आढावा घेण्यात आला. हडपसर भागात होणारी वाहतूक समस्या दूर करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे निश्चितच कमी होईल व शिरूर लोकसभेचा विकास होण्यासाठी हा महत्वाचा टप्पा ठरेल. यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, महानगर आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/