Mexico Bus Accident | मेक्सिकोमध्ये भीषण अपघात! बस खोल दरीत कोसळली, 29 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Mexico Bus Accident | मेक्सिकोमध्ये बस 80 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात (Mexico Bus Accident) झाला आहे. या बस अपघातात 29 जणांचा दुर्दैवी मृत्यू (29 People Died) झाला. तर, 19 जण जखमी (19 People Injured) झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी घडली. एका वृत्तानुसार, बुधवारी सकाळी दक्षिण मेक्सिकोमध्ये बस दरीत कोसळली. हा भीषण अपघात बुधवारी दक्षिणेकडील ओक्साका (Oaxaca) राज्यात घडला.

समोर आलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यात बुधवारी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळल्याने हा अपघात (Mexico Bus Accident) झाला. प्रांतीय वाहतूक पोलिसांनी (Provincial Traffic Police) ट्विट करत सांगितले की, बस मेक्सिको सिटी हून ओक्साका शहराकडे जात होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 29 लोकांचा मृत्यू झाला आणि 19 जखमींना उपचारांसाठी प्रदेशातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, ‘स्थानिक वाहतूक कंपनीची बस मंगळवारी रात्री राजधानी मेक्सिको सिटी (Mexico City) येथून सॅंटियागो डी योसुंडुआ (Santiago De Yosondua) शहराकडे निघाली होती. दुर्दैवाने ही बस 25 मीटर (80 फूट) खोल दरीत कोसळली. वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.’

Web Title :  Mexico Bus Accident | mexico bus crash 29 dead 19 injured in tragic accident in oaxaca

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा